आदिवासीवाडीतील पाण्याची समस्या दूर

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतमधील चिमटेवाडी आणि मोहपाडा येथील आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी नितीन सावंत यांची भेट घेवून कैफियत मांडली होती. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून या दोन्ही ठिकाणी नवीन बोअरवेल खोदून पाणी पुरवठा सुरू केला आहे.

चिमटेवाडीत टंचाई ग्रस्त गावात शासनाचा ट्रँकर मार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तेथील लोकवस्ती यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला ग्रामस्थ यांना काही किलोमिटर अंतर जावून पाणी आणावे लागत आहे. महिलांच्या या दररोजच्या समस्येबद्दल लक्ष्मण पोसाटे, प्रकाश चिमटे यांनी होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली होती. त्यानुसार आठ मे रोजी शिवसेना ठाकरे गट आणि युवासेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नांदगाव ग्रामपंचायत मधील चिमटे वाडी आणि मोहपाडा वाडी मध्ये बोअरवेल खोदणारी मशीनचे सहाय्याने बोअरवेल खोदण्यात आल्या. यावेळी नितीन सावंत, उत्तम कोळंबे, बाबू घारे, सुदाम पवाळी, पंढरीनाथ राऊत, संपत हडप, लक्षमन पोसटे, सुमित चंदन आदी उपस्थित होते.

Exit mobile version