कर्जतमध्ये जलसंजीवनी प्रकल्प

। कर्जत । वार्ताहर ।

युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या अंतर्गत जलसंजीवनी हा प्रकल्प कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये सुरु करण्यात आला आहे. जलसंजीवनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या ग्रामपंचायतीचे निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी निवड झालेल्या गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या सर्व कामांची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मृदा व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पाणी ताळेबंद, क्षमता बांधणी व जनजागृती, हवामान अनुकूल शेती व शेतीपूरक व्यवसाय या घटकांची माहिती देण्यात आली. तसेच तुषारसिंचन पद्धतीची शास्त्रीय माहिती देण्यात आली. गरजू शेतकर्‍यांना संच वाटप करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. याप्रसंगी मंगल ऐनकर, अंकुश ऐनकर, एम.ए.कुटे, श्रीमती कारोटे, उपसरपंच, ग्रामसेविका श्रीमती पाटील, प्रगतीशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version