ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

| पनवेल | वार्ताहर |

ऐन पावसाळ्यात तळोजा वासियांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. काहीवेळा पाणी विकत घ्यावे लागत आहे. वसाहतीमधील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी तळोजा फेडरेशनकडून अनेकवेळा पत्रव्यवहार आणि आंदोलन करुनही सिडकोकडून पाणी समस्येवर उपाययोजना केली जात नाही. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तळोजा वसाहतीला भेट देऊन सिडकोकडून पुरविल्या जाणार्‍या पाणी पुरवठा विषयी माहिती घ्यावी, अशी मागणी तळोजा वासियांकडून केली जात आहे.

Exit mobile version