तालुक्यात १८ गावे तहानलेली

60 वाड्या संभाव्य पाणीटंचाईग्रस्त
पाणी टंचाई कृती आराखडा तयार

| नेरळ । वार्ताहर ।
डोंगर दर्‍या अशा स्थितीची भौगोलिक परिस्थिती असलेल्या कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई ग्रस्त गावे आणि वाड्याच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्यातील 18 गावे आणि 60 येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासीं वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. त्याचवेळी उन्हाळयात कोरड्या पडणार्‍या पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या मार्च महिन सुरू झाल्यापासून जाणवू लागते.त्यात त्या ठिकाणी असलेल्या नळपाणी योजना या कोलमडून असल्याने तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न दरवर्षी गंभीर होत असतो.

ते लक्षात घेवून पाणीटंचाई ग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये राहणारे लोक महिला यांची पिण्याचे पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ट्रँकरमधून पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तालुका पाणीटंचाई कृती समितीकडून तयार करण्यात आला आहे. त्यात नादुरुस्त असलेल्या विंधन यांची दुरुस्ती करणे, तसेच विहिरींची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढणे याशिवाय नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम देखील कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी पाणी टंचाईवर परिस्थीती उद्भवणार्‍या गावे आणि वाड्यांमध्ये ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे आदिवासी वाड्यांमध्ये ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील खांड्स, चेवणे, नांदगाव, तुंगी, ढाक, पेठ, अंत्रट निड, अंत्रट वरेडी, मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतार पाडा, गरुडपाडा अशा गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवणार आहे. तर तालुक्यातील पाच डझन आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने तेथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून ग्रामपंचायतीचे नुसार पिण्याचे पाणी ट्रँकरमधून पोहचवले जाणार आहे. तर 60आदिवासी वाड्यांमध्ये ट्रँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. ट्रॅकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी 39 लाख रुपयांची तरतूद पंचायत समितीने केली आहे. या पाणीटंचाई कृती आराखडा यांचे नियोजन तहसील कार्यालयाकडून केले जाणार आहे.

पाणी टंचाई ग्रस्त भागाची पाहणी करून आणि लोकप्रितिधींनी यांच्याकडून माहिती नुसार संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.हा पाणी टंचाई ग्रस्त भागातील गावे आणि वाड्या यांच्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत कडून मागणी पत्र आल्यानंतर ट्रंकर सुरू करण्याची कार्यवाही केली जात असते. – चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, प्रशासक कर्जत पंचायत समिती

Exit mobile version