शेकापच्या प्रयत्नातून परळवाडी, माणवाडीला पाणी पुरवठा सुरळीत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

तालुक्यातील रामराज विभागातील परळ वाडी आणि माणटवाडी या दोन आदिवाशी वाड्या वरिल पाण्याची बोरिंग बिघडल्याने येथील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत होते. ही गोष्ट लक्षात येताच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष देऊन सदर बोरिंग दुरुस्त करुन येथील पाणी पुरवठा सुरळीत करुन दिला. त्यामुळे ग्रामस्थांनी शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
अलिबाग तालुक्यातील परळ वाडी आणि माणटवाडी या दोन आदिवाशी वाड्यांवर अनेक आदिवासी समाजातील बांधवांची घरे आहेत. या आदिवासी वाड्यांना बोरींगद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठयासाठी हा एकमेव स्त्रोत असल्याने दोन्ही आदिवासी वाड्या या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील बोरिंग नादुरुस्त झाल्या. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल सुरु झाले. पाणी आणण्यासाठी खूप दुरवर जावे लागत होते. ही गोष्ट शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सतीष चंद्रकांत वारगे यांना समजल्यावर त्यांनी जातीने लक्ष देत सदर बोरींग दुरुस्त करुन पाण्याचा प्रश्‍न सोडवला. त्यामुळे समाधान व्यक्त करीत ग्रामस्थांनी शेकापक्षाला धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version