। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे हाती घेण्यात येणार्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे आणि करंजाडे नोडमधील पाणी पुरवठा शुक्रवार, 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून ते शनिवार, 12 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी संबंधित नोडमधील नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी व सदर कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.