। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील आगरसुरे फाटा ते सातीर्जेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाण्याने भरलेला टँकर पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघात झाला. या अपघतात टँकर चालक ठार झाला. तर, टँकर मालक गंभीर जखमी झाला.
याबाबत मांडवा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि.26) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास पाण्याने भरलेला टँकर (एमएच-06-बीयु-1666) घेउन चालक मंगेश दत्तात्रेय करळकर (61) रा. मुशेत, हा आगरसुरे फाटा ते सातीर्जे या मार्गावरून जात होतो. यावेळी टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उजव्या बाजूला जात नदीवरील पुलाची लोखंडी रॅली तोडून पुलावरून खाली कोसळळा. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला. तर, टँकरमध्ये सोबत असलेले टँकर मालक योगेंद्र गोविंद नार्वेकर (65) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. लांडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी यांना बाहेर काढले. तसेच, पिंट्या गायकवाड यांच्या रुग्णवाहिकेतुन अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताबाबतचा अधिक तपास मांडवा पोलीस व्ही.जी.पाटील हे करीत आहेत.