। अलिबाग । प्रतिनिधी ।
मांडवा ते गेटवे जल वाहतूक सेवा (दि.26) मे पासून बंद असणार आहे. मात्र, रो-रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून देण्यात आली आहे.
मांडवा येथून गेटवे मार्फत पीएनपी, अजंठा, मालदार या कंपन्यांची प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू आहे. हजारो प्रवासी प्रवास करतात. पावसाचा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने घेतला आहे. दरम्यान, भाऊचा धक्का ते रेवस जलवाहतूक सेवा ही बंद राहणार आहे. मात्र, रो-रो सेवा सुरु राहणार आहे.