शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

अलिबाग नगरपरिषदेकडून सहकार्याचे आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग शहरात तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खराब झालेल्या पाईप लाईनचे काम एक फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे.वायशेत जवळ लिकेजचे काम निघाल्याने एमआयडीसी विभागाने पाच तासाचा शटडाऊन केला आहे. शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी तीन वाजल्यापासून वीज पूरवठा खंडीत असल्याने नगरपरिषदेची पंपिंग बंद आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र पुढील तीन दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे.

Exit mobile version