आम्हाला मंत्रीपद गमावण्याची भीती: सामंत

| नागपूर | प्रतिनिधी |

मी चांगलं काम केलं नाही तर अडीच वर्षांनंतर माझ्या जागी दुसर्‍या नेत्याला मंत्री केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. परंतु, अडीच वर्षे कशाला, मी जर चांगलं काम करत नसेल तर दोन-तीन महिन्यांतदेखील माझं मंत्रीपद काढून घेतलं जाऊ शकतं, अशी भीती शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. आम्हाला जनतेला अभिप्रेत असं काम करावं लागेल. सर्व नेत्यांना आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. महायुतीला न्याय द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र आहेत. परंतु, आम्हाला 11 ते 12 मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यापैकी मंत्रिपद कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. अशावेळी वरिष्ठांचा कस लागतो. त्यानंतर कोणी नाराज असतील तर त्यात वरिष्ठांचा दोष नसतो. आमचे 57 आमदार आहेत आणि 11, 12 मंत्रीपदं आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो, असेही सामंत म्हणाले.

Exit mobile version