| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाण्यात दसऱ्यानिमित्त परंपरागत पद्धतीने शस्त्र पूजन परी मंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक केले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आज वर्षानुवर्ष परंपरागत सुरु असलेला दसरा निमित्ताने शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परी मंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक उपस्थित राहून शस्त पूजन विधिवत पद्धतीने केले.
यावेळी महिला दक्षता समितीच्या माधुरी गोसावी, पत्रकार संजय कदम, साहिल रेळेकर, मयूर तांबडे, मिलिंद मोडघरे, परदेशी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. शस्त्र पूजनामध्ये पिस्टल, लाठीकाठी, रायफल, एके 47, अश्रूधूर, बेड्या तसेच अत्याधुनिक शस्त्रांची पूजा करण्यात आली.