| पुणे | प्रतिनिधी |
राज्यभरात पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या इशाराने शेतकर्यांसह आंबा, काजू बागायतदार तसेच वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातारवरण पसरले आहे.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासह कोकणात पावसासोबतच तापमानातदेखील वाढ होणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. विशेषतः 23 मार्चनंतर अवकाळी पावसाचा प्रभाव वाढेल. रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.