जलतरणपटू संकेत म्हात्रे याचे पाटणेश्‍वरमध्ये स्वागत

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील पाटणेश्‍वर गावचा सुपुत्र संकेत केशव म्हात्रे याने संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशनच्या वतीने ओपन इंटरनॅशनल चॅम्पिअनशिप (नेपाळ-पोखरा) 2022 या जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.

संकेतने फ्रि स्टाईल जलतरण स्पर्धेत 100 मीटर व 200 मीटर या प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे बुधवारी (दि.23) पाटणेश्‍वर ग्रामस्थांनी पाटणोली प्रवेशद्वारापासून त्याची जंगी विजय मिरवणूक काढली.

या मिरवणुकीसाठी पाटणेश्‍वर सरपंच मानसी पाटील, नगरसेवक संतोष पाटील, माजी सरपंच नरेंद्र पाटील, सुधाकर पाटील, नंदा म्हात्रे, माजी उपसरपंच मंगेश पाटील, संजय म्हात्रे, माजी पोलिस पाटील भालचंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version