| रसायनी | प्रतिनिधी |
आकुळवाडी येथे चोरघे फार्महाऊस येथे तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. रसायनी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संजू रामलाल अहिरवार (वय 28, रा. ग्रामतोड, जि. अशोक नगर, मध्यप्रदेश, सध्या रा. आकुळवाडी) असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आकुळवाडी येथील चोरघे फार्महाऊस येथे उघड्या शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत मनीराम रामलाल अहिरवार याने रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून संजू रामलाल अहिरवाल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय चौक येथे पाठविण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत सपोनि घरबुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार शेळके अधिक तपास करीत आहेत.