श्री साई ट्रस्टकडून व्हीलचेअरची मदत

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या श्री साई ट्रस्टकडून बेकरे गावातील शेवंता किसन कराळे यांना व्हीलचेअर मदत म्हणून देण्यात आली.

बेकरे गावातील शेवंता कराळे यांना पायात व्यंग आले आहे. त्यामुळे त्यांना चालता येत नसल्याने त्यांना नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्टकडून व्हीलचेअरची मदत व्हावी, अशी विनंती माणगाव ग्रामपंचायतीमधील माजी सदस्य जयेंद्र कराळे यांनी श्री साई ट्रस्टचे संचालक राधिका घुले यांच्याकडे केली होती. त्यानुसार नवी मुंबई येथील मुख्य कार्यालयात परवानगी दिल्यानंतर बेकरे गावी जाऊन शेवंता किसन कराळे यांना व्हीलचेअर भेट देण्यात आली. त्यावेळी श्री साई ट्रस्टचे अध्यक्ष गणेश नायर, संचालिका राधिका घुले तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले, माजी सदस्य जयेंद्र कराळे, तसेच प्रशांत कराळे, किसन कराळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version