ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याच्या जेट्टीला मुहूर्त कधी?

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याच्या जेट्टीकरिता निविदा मंजूर होऊन सुध्दा कामाला बांधकामाला मुहूर्त कधी? मुरुड तालुक्यातील राजपुरी गावा जवळील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक ये-जा करित असतात. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्यावेळी शिडाच्या बोटी किल्ल्या जवळ पोहचताच प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने पर्यटक जेष्ठ नागरिकांना किल्ल्यात उतरताना त्रास सहन करावा लागतो.

किल्लात उतरतेवेळी अनेक पर्यटक जखमी होत असल्याने किल्लाभोवती तरंगती जेटी बांधावी अशी मागणी स्थानिक व पर्यटकांनी केली होती. त्या मागणीला यश येऊन ५००पर्यटक सुरक्षित उतरतील अशी भव्य जेटी व समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी २५० मिटर लांबीचा लाटरोघक भिंत बांधण्याकरिता ९३ कोटी ५६ लाख रुपयांची सागरमाला योजनेअंतर्गत निविदा मंजूर करण्यात आली होती. मेरीटाईम बोर्ड मार्फत या कामाला २०२३जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होणार होती. परंतु आजुन पर्यंत मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांना मुर्त मिळेना.

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याच्या जेट्टीच्या बांधकाम जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होईल व पुढील २ वर्षांत जेटीचे काम पूर्ण होईल अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे त्यावेळी दिली होती.

Exit mobile version