| मुंबई | दिलीप जाधव |
राज्यातील 173 मत्स्य बंदरे गाळानी भरलेली असून त्यातील गाळ कधी काढणार, असा सवाल शेकाप आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषेदत सरकारला केला. गाळाने बंदरे भरल्यामुळे मच्छीमार बांधवाना दिवसरात्र वापरता येत नाही. त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
यावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या सागरी किनारपट्टीवर एकूण 173 मासळी उतरविण्याच्या केंद्रांपैकी काही बंदरावर सागरी प्रवाहामुळे साचत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या बोटी वाहतुक करताना अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची कबुली दिली. राज्यातील 173 बंदरातील गाळ काढून बंदरे 24 तास सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच राज्यातील मत्स्य बंदरा मधील गाळ काढण्या संदर्भात मत्स्यव्यवसाय विभाग, मेरीटाईम बोर्ड व मच्छीमार संस्था यांच्या बैठका होऊन 43 ठिकाणी गाळ उपसनी क्षेत्र नक्की केले आहे. याबाबतच्या प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे, असे ते म्हणाले.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायभूत विकास निधी योजना अंतर्गत हर्णे, साखरीनाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी या पाच तलावांची पाच कामे करण्यात येत आहे. त्या अनुशंगाने आवश्यक पर्यावरण पूरक परवानगी घेण्याची कार्यवाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्या कडून करण्यात येत आहे. सदर प्रकल्पामध्ये गाळ काढने समावेश असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.