अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

मे 2027 पर्यंत खड्ड्यातूनच प्रवास

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ मार्फत अलिबाग बायपास ते रोहा तालुक्यातील तळेखार (साळावमार्गे) या सुमारे 30 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही प्रवाशांना मात्र धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, या रस्त्याचे काम मे 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजेच अलिबाग, रोहा आणि मुरूडकरांना आणखी दीड वर्ष खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार, असे चित्र सध्या दिसत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून, ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. सहाण बायपासपर्यंत रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांची अक्षरशः धुळधाण उडत आहे. नाकातोंडात मातीचे कण जात असून दुचाकीस्वार, विद्यार्थी आणि रुग्णवाहिका यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांच्या कटाई करण्याबरोबरच ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना धूळखात जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मात्र, हा त्रास कधी कमी होणार असा प्रश्न प्रवाशी वर्गाकडून विचारला जात आहे. मे 2027 पर्यंत प्रवाशांना खड्डयातून प्रवास करण्याची वेळ येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी दीड वर्षांचा वनवास या मार्गावरील प्रवाशांना भोगावा लागणार आहे.

अलिबाग – रोहा मार्गावरील रस्त्याचे राजकारण करून विद्यमान आमदारांनी मतदारांची मते मिळविली. स्वखर्चाने रस्ता तयार करणार असे त्यांनी सांगितले होते. अनेक वेळा नारळ फोडीच्या स्पर्धा झाल्या. भाजप विरूध्द शिंदे गट यांच्यामध्ये कामाचा श्रेयवादही झाला होता. मात्र, दोन वेळा आमदार होऊनही हा रस्ता आमदार पुर्ण करू शकले नाही. आजही या रस्त्यावरून धुळखात प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यातून प्रवास करताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने अलिबाग बायपास ते रोहा तालुक्यातील तळेखार (साळावमार्गे) हा तीस किलो मीटरचा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. साळावपासून काँक्रीट रस्त्याचे काम मागील वर्षी पावसाच्या अगोदर करण्यास सुरुवात केली. मात्र, पावसाळ्यात चिखलात प्रवास करावा लागला. अजूनही हा रस्ता अपूर्णस्थितीत आहे. मागील दोन महिन्यांपासून अलिबाग बायपासपासून रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सहाण बायपासपर्यंत रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.

ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वाहतूक कोंडीचा फटका बसत असताना खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांना येत आहे. धुळ, मातीचे कण नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. हा रस्ता कधी होणार, पावसाळ्यात पुन्हा चिखलात प्रवास करावा लागणार का? असा प्रश्न प्रवासी करीत आहेत. रुंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे सुरु असलेले काम 171 कोटी रुपयांचा आहे. या रस्त्याचे काम मे 2027 पर्यंत पुर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अलिबाग – रोहा व मुरूडकरांना मे 2027 पर्यंत खड्डयातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

राजकारणात रस्ता, प्रत्यक्षात खड्ड
अलिबाग-रोहा मार्गावरून राजकीय श्रेयवाद रंगला होता. भाजप आणि शिंदे गटात कामाच्या श्रेयासाठी चुरस दिसली. नारळ फोडीचे कार्यक्रम झाले, आश्वासने दिली गेली. 'स्वखर्चाने रस्ता करणार' अशीही घोषणा करण्यात आली. मात्र, दोन कार्यकाळ उलटूनही रस्ता पूर्णत्वाला पोहोचलेला नाही.
Exit mobile version