| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड-नादगांव ग्रामपंचायत हद्दीतील सुरेल पेठ येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने सामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मुरुड-नांदगाव मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. त्यात अरुंद रस्ते व रस्त्यावर बिंधास्तपणे मोटारसायकल लावल्याने याठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे येऊन ही वाहतूक कोंडी सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






