खंडाळेत विरोधकांचा डाव हाणून पाडला

| अलिबाग | प्रतिनिधी |
खंडाळे ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत सुरु असताना शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. निवडणूकीत पराभव होणार असल्याचे दिसताच त्यांनी हा प्रताप केल्याचे इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील मतदार एका टेम्पोतून तळवली येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते. मतदारांना काबीज करण्याचा डाव शिंदे गट शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आखला होता.

ही बाब शेकाप कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विरोधकांना रोखले. त्यावेळी शाब्दीक वाद झाला. आपला पराजय होण्याची भीती शिंदे गटाला निर्माण झाल्याने त्यांनी त्याठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आ. दळवी तसेच त्यांची पत्नी मानसी दळवी यांनी देखील आरेरावी केली. मात्र शेकापच्या दणक्याने विरोधकांचा डाव हाणून पाडला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Exit mobile version