सफेद कांद्याला चांगला भाव मिळावा

खंडाळा पंचक्रोशीतील संघटीत शेतकर्‍यांची मागणी
। अलिबाग । भारत रांजणकर ।
आपल्या चवीने आणि औषधी गुणधर्मामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या अलिबाग तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशीतील सफेद कांद्याला जिआय मानांकन प्राप्त झाले आहे. तथापि लहरि निसर्गामुळे शेतकर्‍यांना फार मोठया संकटाना सामोरे जावे लागत आहे. या संकटावर मात करुन सफेद कांद्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांनी संघटीत होत चांगला भाव मिळण्याची मागणी केली आहे.
खंडाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक थळे, माजी सरपंच जयेश पाटील, नासिकेत कावजी, रविंद्र म्हा,े विलास परकर, सचिन पाटील, सचिन पाटील आदींसह शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, तळवली, सागाव, वाडगाव, रुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सफेद कांद्याची लागवड केली जाते. अलिबागचा कांदा औषधी व चविला चांगला असल्याने या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेकडो वर्षांपासून या कांद्याचे बियाणे टिकवून ठेवला आहे. याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. जिआय नामांकन मिलाळ्यांनतर त्यांतून मिळणार्‍या कायद्याच्या लाभातून पुरेपूर संरक्षण कशाप्रकारे करुन घ्यायचे. बाहेरुन येणारा कांदा अलिबागच्या नावाखाली विकला जाऊ नये यासाठी शेतकरी संघटीत झाल्याचेे जयेश पाटील, अशोक थळे, सचिन पाटील यांनी सांगितले.
भात कापणीची कामे पुर्ण झाल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  सफेद कांद्याची लागवड करण्यात आली. तालुक्यात सुमारे 280 हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली आहे. परंतू अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. तरीही त्यावर मात करीत शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड योग्य पध्दतीने व्हावी यासाठी प्रयत्न केले.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सफेद कांदा काढणी योग्य झाला असून कार्ले परिसरात ठिकठिकाणी कांदा काढणीसह माळ तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या व्यवसायातून सुमारे दीड हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे.

कांद्या लागवडीतून मिळतो महिलांना रोजगार
तालुक्यातील कार्ले परिसरात घरपट्टीनुसार कांदा उत्पादक लहान मोठे शेतकरी आहेत. कांदा लावणीपासून, बेणनी, काढणी, माळ बांधणीची कामे येथील महिलांना मिळतात. या व्यवसायातून दीड महिलांना रोजगार मिळतो. या रोजगारातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास मदत होत आहे.

अलिबागचा सफेद कांदा आकाराने मध्यम असून चविष्ट आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वेगवेगळ्या जिल्हयासह राज्य, देश विदेशात राहणारे भारतीयदेखील अलिबागचा कांदा घेत असतात.

Exit mobile version