कोण होणार अध्यक्ष? निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण, त्यावर कोणताच निर्णय झालेला नसल्याचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याचे वृत्त विविध वाहिन्यांवर प्रसारित केले जात होते. मात्र, असा कोणताच निर्णय झालेला नसल्याचे ते स्पष्ट केले.

दरम्यान, अध्यक्ष पदाबाबत दि.5 रोजी निवड समितीची बैठक होणार असून राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष त्याच दिवशी ठरणार आहे. नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक होणार असे समजते. तर समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

आज कोणत्याही प्रकारची पक्षाची बैठक झाली नाही. बैठक बोलवण्यात आली नव्हती. आज निर्णय होणार असल्याच्या बातम्या आल्या त्यामध्ये तथ्य नाही. आज कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवार यांनी आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही .

प्रफुल्ल पटेल, खासदार

आम्ही कोणती बैठक घेतली तर त्याबाबत आम्ही तुम्हाला कळवू. बैठकीबद्दल तुम्हाला सांगू. दिवसभरात आलेल्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही. दिवसभरात नवीन अध्यक्ष कोण होणार यांच्या बातम्या आल्या आहेत त्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा केला आहे. आम्ही गुुरुवारी शरद पवार यांना भेटू. त्यांनी काही निर्णय घेतला तर तो सांगण्यात येतील. तर छगन भुजबळ यांनी दिलेली त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया होती. त्यावरून नावाच्या चर्चा झाल्या ही चुकीची बाब आहे. तर बैठक होईल तेव्हा मी त्याचा निमंत्रक असेल तेव्हा मी सांगेन अस प्रफुल्ल पटेल म्हणालेत.

शरद पवार यांनी अजून निर्णय घेतलेला नाही. त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ द्या. तसेच काही शरद पवार यांनी काही निर्णय घेतला तर तो कळवण्यात येईल. जयंत पाटील नाराज नसल्याचंही पटेल यांनी म्हंटलं आहे. ते त्यांच्या कारखान्याच्या कामासाठी पुण्याला गेले होते. त्यांच्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या त्यावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर मी अध्यक्षपद घेण्यास तयार नसल्याचंही पटेल यांनी यावेळी सांगितलं आहे.

Exit mobile version