माथेरानमध्ये विकासकामांच्या जोरावर कोण मारणार बाजी ?

महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीला होणार फायदा ?
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान हे पर्यटन स्थळ गेल्या काही महिन्यात बदललेले दिसून येत आहे.महाराट्र राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आले आणि माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मधील विकासाला चालना मिळाली.माथेरान मधील पायाभूत सुविधांची बांधणी सत्ताधारी शिवसेनेकडून सुरु असून त्यात शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. माथेरान हे 100 टक्के पर्यटनावर आधारित पर्यटनस्थळ असल्याने स्थानिकांना पर्यटनातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शहराचा कायापालट आगामी सात्र्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेसाठी आणि त्या पाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी मधील शिवसेनेचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस होऊ शकतो. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाण्यासाठी काही ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकचे तर काही ठिकाणी जांभा दगडाचे खड्डेविरहित तसेच धुळविरहित सुबक रस्ते बनविण्यात आले आहेत. तसेच पॉईंट्सला जाणार्‍या रस्त्यांवर, पर्यटकांना काळोखात प्रकाश दिसावा यासाठी पथदीवे व सोलर दिवे लावण्यात आले आहेत, त्यामुळे रात्री अपरात्री पर्यटक कोणत्याही वेळी माथेरान मध्ये पोहचु शकतात.पर्यटकांच्या सोयीसाठी काही मुख्य पॉईंट्सच्या बाहेर जवळपास अंतरावर, महिला व पुरुषांना सुलभ शौचालय बांधण्यात येत आहेत, ते ही लवकरच चालू होतील.


दरम्यान माथेरान मध्ये सुरु असलेल्या या विकासकामांचा धडाका यात माथेरानच्या पर्यटनाची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या मिनीट्रेनच्या पुन्हा सुरु करण्याच्या प्रक्रियेला महाविकास आघाडी सरकारची असलेली धडपड कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला माथेरान मधील विकासकामांचा फायदा होणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील होणार आहे. कारण जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचे माथेरान मधील विकासात मोठे योगदान आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यात माथेरान मध्ये शिवसेनेच्या एका गटाचे राष्ट्रवादी सोबत जुळत असून त्यातून महाविकस आघाडीचा प्रयोग माथेरान मध्ये यशस्वी होईल असे बोलले जात आहे.

प्रेक्षणीय स्थळांचे पालटले रूप
माथेरानचे जवळपास 50 टक्के पॉईंट्स सुशोभित होत आहेत आणि प्रेक्षणीय होत आहेत. तसेच पॅनोरमा, हार्ट, मायरा असे पॉईंट नष्ट होत असलेले पॉईंट पुन्हा जिवंत झाले आहेत. तर शहरातून प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे विविध 11 रस्ते आणि शहरात येणारा मुख्य रस्ता यांसाठी 25 कोटींचा माथेरानला होत असलेल्या विविध प्रेक्षणीय स्थळांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी काम सुरु झाले.

Exit mobile version