पैसे नसताना जलजिवन मिशनच्या निवीदा कशाला

शेकाप नेते पंडित पाटील यांचा सवाल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जलजिवन मिशन कंद्र सरकारची योजना रायगड जिल्हा परिषदेमध्ये निवीदा प्रक्रीया 10 टक्के लोकवर्गणी न भरता निवीदा सुचना काढली जाते जलजीवन मिशन मध्ये गेल्या दोन वर्षात राज्य सरकारच्या कुठल्याच खात्यामध्ये निधी आलेला नाही. फक्त वर्क ऑर्डर काढून त्या योजना आजारी पाडण्याचे कारण काय असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.
निधी प्राप्त झालेला नसतानाच जलजिवन मिशनच्या योजनांच्या निवीदा सुचनांवर टिका करताना पंडित पाटील म्हणाले की, जलजिवन मिशन मध्ये दोन दोन कोटी रुपयांच्या योजना जिल्हा परिषदेने काढल्या आहेत. त्यात दररोज वाढ होते. यासंदर्भातील दरफरक हा सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र जिवन प्राधीकरण यांना लागू आहे. पण जलजिवन मिशन मध्ये तो लागू होत नाही. त्यामुळे आज राष्ट्रीय पेयजल योजनेच्या दोन अडीचशे योजना आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या अपूर्ण आहेत. असे असताना जलजिवन मिशनमध्ये पैसे नसताना निवडणूका डोळयासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे प्रशासन निवीदा काढण्याचा अट्टाहास का केला जातोय असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सर्वप्रथम जलजिवन मिशन योजनेाठी शासनाकडून पैसे जमा करावेत, ज्यांची निवीदा प्रक्रीया पुर्ण झाली आहेत ती कामे पुर्ण करावीत. त्यानंतरच सदर योजनांच्या निवीदा काढाव्यात असा सल्लाही पंडित पाटील यांनी दिला आहे. शंभर योजना हाती घ्यायच्या आणि निधी अभावी त्या बंद पाडायच्या याला काही अर्थ नाही. जेवढा निधी उपलब आहे त्याच्या दीडपट वर्कऑर्डर काढा. शंभर कोटी रुपये आले तर दीडशे कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर काढा. मात्र जलजिवन मिशन मध्ये एकही रुपया नसताना रायगड जिल्हा परिषद निवीदा सुचना काढण्याचे घाई करण्याचे कारण काय असा सवाल करतानाच निवीदा काढून जनतेची फसवणूक करु नका अशी कडक सुचना पंडित पाटील यांनी केली आहे.

सदर योजनांना शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. जुन्या कामांचे लेखा परिक्षण पुर्ण झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील जिल्हा परिषदांना सदर निधी लवकरच प्राप्त होईल.
ए डी एजरे
प्रभारी कार्यकारी अभियंता
जल जिवन मिशन

Exit mobile version