। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील नागरिक वन्य माकडांमुळे हैराण झाले असून या वन्य माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तळा शहरात अन्नाच्या शोधात वन्य माकडे मानवी वस्तीकडे वळली असून ही वन्य माकडे सर्वत्र हैदोस घालत असल्याने शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर असणारे वन्य माकडे झाडांवरील फळे खाऊन रहात असत. मात्र, काही वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गडावरील झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तसेच, गडावर माकडांसाठी खाद्य पदार्थ घेऊन जाणार्या पर्यटकांची संख्यादेखील मंदावली असल्याने माकडांना खायला खाद्य उरले नाही. परिणामी अन्नाच्या शोधात या माकडांना मानवी वस्तीत यायची वेळ आली आहे. त्यामुळे वनविभागाने यामध्ये लक्ष देऊन वन्य माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







