| आगरदांडा | प्रतिनिधी |
फणसाड अभयारण्य व ग्रीन वर्क ट्रस्ट व अंशु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, यशवंतनगर, नांदगाव येथील पाचवी व आठवीच्या दोन गटात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी. वन्यजीव, पक्षी व वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. तसेच ग्रीन वर्क ट्रस्टचे निखील भोपाळे यांच्या सदस्यांनी नवीन गिधाड इ-कार्ड उपक्रम आयोजित केले.
समारोपप्रसंगी माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांची चिकणी गावातून जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वन्यजीवबाबत, जैवविविधताबाबत पीपीटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वन्यप्राण्यांच्या माहितीवर आधारित स्पर्धेतील यशस्वी स्पधर्कांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. या वन्यजीव सप्ताह सांगता कार्यक्रमासाठी फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर, काशिद वनपाल एस.एल. शिंदे, सुपेगाव वनपाल ए.व्ही. तांडेल, एस.बी. पाटील, ग्रीन वर्क ट्रस्टचे निखील भोपाळे, अंशु फाऊंडेशनचे निलेश गुंड, सर्वे चिकणी ग्रामस्थ, वनकर्मचारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.