। मुंबई । प्रतिनिधी ।
वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर ते आता देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यासह लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या भेटीत सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाऊ शकते. हा प्रकल्प राज्यातच रहावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील, हे देखील मोदींना या भेटीदरम्यान पटवून देण्याचा या तीनही मंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे.