। महाड । वार्ताहर ।
महाडकरांना मैदानाची गरज आहे त्यांची ही उपेक्षा आपण नक्की पूर्ण करणार मैदानातून अनेक प्रकारचे खेळाडू तयार व्हावेत असे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे केले.
महाड येथील चांदे क्रिडांगण येथे अनिकेत समर्थ ग्रुप महाड आयोजित महाड प्रिमिअर लिगचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी सुनिल तटकर स्पर्धेला भेट दिली. यावेळी ते म्हणाल की, आपणही शालेय कॉलेज जिवनात अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकीक मिळविला होता. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळामध्ये खेळ स्पर्धा थांबल्या होत्या मात्र आता त्या सुरु झाल्यामुळे तरुण खेळांडूमध्ये आंनदाच वातावरण पहावयास मिळत आहे. यावेळी सुनिल तटकरे यांनी चौफेर फटकाजी करत प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
सध्या महाडची क्रिकेट पंढरी समजली जाणारे चांदे क्रिंडागण येथे अनिकेत समर्थ ग्रुप महाड प्रिमिअर लिग स्पर्धा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. समर्थ ग्रुपचे अध्यक आशिष चिखले त्यांचे समर्थक विशेष मेहनत घेत आहेत.
महाडकरांची मैदानाची अपेक्षा पूर्ण करणार ; सुनिल तटकरे
