बेशिस्त खेडळाडूंवर कारवाई करणार- अ‍ॅड. आस्वाद पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात होणार्‍या कबड्डी स्पर्धांमध्येे बेशिस्तपणे वागणारे खेळाडू, त्याचबरोबर त्यांच्या संघावरदेखील कडक कारवाई करण्याचा निर्णय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारी मंडळ व नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे सदस्य यांची संयुक्त बैठक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी ही माहिती दिली. पंच, खेळाडू तसेच प्रशिक्षक यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातून तज्ज्ञ मंडळींना बोलवण्यात येईल, असे अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले.रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळूशेठ पाटील, सूर्यकांत ठाकूर, हिराचंद पाटील, खजिनदार प्रमोद ठाकूर, कार्यकारिणी सदस्य व विविध समित्यांचे सदस्य या सभेला उपस्थित होते. घनशाम कराळे, सुहास पाटील, विनोद पाटील, संकेत धुमाळ, प्रफुल्ल पाटील, संजय मोकल, जगदीश पाटील, अनिकेत म्हात्रे आदींनी या सभेत काही सूचाना मांडल्या. त्यावर चर्चा करण्यात आली. सहकार्यवाह जे.जे. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Exit mobile version