शिवपुतळ्याची योग्य खबरदारी घेणार

महाड | प्रतिनिधी |


राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सोमवारी 6 डिसेंबरला किल्ले रायगडावर येत आहेत. त्यासाठी राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांनी हेलीकॉप्टर ऐवजी रोप वे ने रायगड किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाचाड येथे यासाठी हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केला आहे.
यापूर्वी जे राष्ट्रपती, पंतप्रधान छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर आले होते हेलिकॉप्टर उतरविले त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर माती व धुळ उडत असल्याचे लक्षात आल्यामुळे शिवप्रेमीनी हा विरोध केला होता. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version