गॅस सिलिंडर पुन्हा वाढणार?

। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ झाली होती. सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली असून आता पुन्हा गॅस दरवाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती झाली आहे.


कच्च्या तेलाच्या किंमतीत भडका उडाल्याने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून बुधवारी 1 जून 2022 रोजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जाईल. ज्यात दरवाढीचा बॉम्ब फुटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या बुधवारी 1 जून रोजी सिलिंडर आणखी महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरवाढीपासून बचाव करण्यासी आजच सिलिंडर बुक करण्याचा सल्ला दिला आहे.

Exit mobile version