विंडीजचा अफ्रिकेवर सहज विजय

| त्रिनिनाद | वृत्तसंस्था |

वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय नोंदवला. ॲलिक अथानाझे, निकोलस पूरन आणि शे होप या तिघांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले आहे. या तिघांच्या फटकेबाजीमुळे विंडीजने 175 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांत 3 गडी गमावत सहज पार केले. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या आघाडीच्या फलंदाजांनीच विजयाचा भक्कम पाया रचला. सलामीवीर अथानाझे व होप यांनी 8 षटकांत 84 धावांची भागीदारी केली. अथानाझे 30 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर होप अन्‌‍‍ पूरन यांनी भार पेलला. होपने 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. पूरनने सूत्र हाती घेताना सामना संपवला. त्याने 26 चेंडूंत 2 चौकार व 7 षटकारांसह 65 धावांची नाबाद खेळी केली. विंडीजने 17.5 षटकांत 3 बाद 176 धावा करून विजय मिळवला.

Exit mobile version