न्यू स्टार वाघ्रणला उपविजेतेपद
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील न्यू स्टार वाघ्रण संघाच्या वतीने अंडरआर्म षटकार मारीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. शनिवार, 9 व रविवार, 10 एप्रिलदरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात विहान स्पोर्ट्स विजेता ठरला, तर न्यू स्टार वाघ्रण संघाला उपविजेतेपदावर समानाध मानावे लागले. या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.च्या माजी सदस्या भावना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाघ्रण सरपंच डॉ. प्रेरणा म्हात्रे, उपसरपंच सरोज पाटील, सदस्य मनिषा पाटील, सदस्य दीपक पाटील, सदस्य रूपेश पाटील, सदस्य गीता पाटील, तसेच रामकृष्ण पाटील, गिरीश पाटील, अविनाश म्हात्रे, दयानंद म्हात्रे, प्रमोद पाटील, आत्माराम पाटील, मारूती गावंड, जयवंत पाटील, लहू पाटील, रविकिरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान रायगड भूषण पुरस्कार प्राप्त प्रथमेश म्हात्रे (कलाक्षेत्र) व दीपक पाटील (पत्रकार) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पेणमध्ये मिस्टर रायगड स्पर्धेत बेस्ट पर्सन्यॅलिटीचा पुरस्कार प्राप्त केलेल्या तन्मय पाटील याचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विहान स्पोर्ट्स वाघ्रण संघाला 15000 व चषक, द्वितीय क्रमांक न्यूज स्टार वाघ्रणला 8000 व चषक, तृतीय क्रमांक पिरबाबा मेढेखारला 5000 व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट बॉलर कल्पेश पाटील मेढेखार, बेस्ट फलंदाज करण पाटील मेढेखार यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.