अज्ञात इसमांकडून महिलेची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

गळ्यातील सोन्याची सर पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका महिलेची दोन अज्ञात इसमांनी फसवणूक केल्याची घटना पनवेल तालुक्यातील आजिवली गावात घडली आहे. येथील निरा कृष्णा मूल्य यांच्या घरासमोरील अंगणात दोन अनोळखी इसम आले व त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करायचे आहे का, असे त्यांना विचारले. यावेळी निरा यांनी चांदीचे जोडवे व गळ्यातील सोन्याचे सर पॉलिश करायचे असल्याचे त्यांना सांगितले व त्यांना पायातील चांदीचे दोन जोडवे दिले. यावेळी त्यांनी ते पॉलिश करून दिले, त्यानंतर गळ्याचे दोन तोळ्याची सोन्याची सर काढून त्यांना पॉलिश करण्यासाठी दिले असता त्या दोघांनी पॉलिश करण्यासाठी गरम पाणी करण्यास सांगितले. निरा या गरम पाणी करण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेल्या व काही वेळाने गरम पाणी घेऊन आल्या असता ते दोन्ही इसम दिसून आले नाही. याबाबत त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांना देखील काहीही माहिती नव्हते. त्यामुळे या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version