| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या एका महिलेला लोकलची धडक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, महिलेने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. लविंदर कौर सरवन सिंग गिल (50) असे या महिलेचे नाव असून, त्या खारघर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 च्या सीएसएमटी टोकावर उभ्या होत्या. यावेळी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची त्यांना जोरात धडक लागल्याने त्या या गाडीखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.






