रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडून वृद्धेचा मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई पश्चिमेतील विशालनगर परिसरात पाच ते सहा फूट पाणी साचले. या साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लिलाबाई रोहम (60) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेतील मृत महिला लिलाबाई रोहम या विशालनगर येथील भगवती अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. मुसळधार पावसामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास या परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले होते. या पाण्यात चालताना लिलाबाई अचानक घसरून पडल्या. याबाबत माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने त्यांना सरळ रुग्णालयात घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना खुर्चीत बसवून अर्धा किलोमीटर अंतरावरील पंचवटी नाक्यापर्यंत आणले. पंचवटी नाक्यावरून ॲम्बुलन्सद्वारे त्यांना वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version