महिलेचा होरपळून मृत्यू

| रसायनी | वार्ताहर |

साडीला आग लागून 55 वर्षीय महिला होरपळून मृत्यूमृखी पडल्याची दुर्दैवी घटना रसायनीमध्ये घडली आहे. तुराडे आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या कमलाबाई वसंत कातकरी (55) यांचा गुरुवारी मृत्यू झाला.

याबाबत रवींद्र वसंत कातकरी (36, रा. कैरे) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आपली आई कमलाबाई कातकरी हिस तुराडे येथील राहत्या घरातील गॅसची आग साडीला लागून होरपळली होती. या तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करत असून, आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version