सर्पदंशाने महिलेचा मृत्यु

| खोपोली | वार्ताहर |
पहाटेच्या सुमारास शौचविधीस जाणार्‍या आमरावती गिरी (वय 65), महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुर्घटना मोहनवाडी येथे गुरूवारी घडली आहे. गगनगिरी मठाच्या काही अंतरावर तसेच पातळगंगा नदी शेजारीच चाळीत ही महिला राहते. अंधारात विषारी सापाने दंश केल्याने महिला जागीच बेशुद्ध पडली.यादरम्यान घरच्यांना घटना त्वरीत समजताच उपचारासाठी नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच ती मयत झाली. माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी मदतकार्य केले.

Exit mobile version