सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील उणेगाव येथील 40 वर्षीय महिलेला जंगलात लाकडे तोडण्यास गेल्या असता कोणत्यातरी विषारी सापाने त्यांच्या उजव्या पायास चावल्याने त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरची घटना दि.23 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती भोईवाडा पोलीस ठाणे येथून अकस्मात मृत्यूबाबत टपालाने कागदपत्रे प्राप्त झाल्यावर या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद सहदेव दाभाजी सालदूर (40) रा. वावे, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक के.डी. जाधव या करीत आहेत.

Exit mobile version