। चंद्रपूर । प्रतिनिधी ।
सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव येथे वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. ही घटना शनिवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेखा मारोती येरमलवार (55) असे मृत महिलेचे नाव असून त्या शुक्रवारी (दि. 29) निलसनी पेडगाव गावानजीकच्या जंगलात झाडण्या कापण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रेखा यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व गावकरी यांनी जंगलात शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर शनिवारी सकाळी सात वाजता जंगलात रेखाचा मृतदेह मिळाला.