। पुणे । प्रतिनिधी ।
येरवडा येथे शनिवारी (दि. 30) दुपारच्या सुमारास एका घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील सर्व सामान जळून खाक झाले.
येरवडा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत क्र.2 चे काम चालू आहे. या ठिकाणी आतील बाजूस गेले पन्नास वर्षापासून शासकीय वसाहत आहे. या चाळीत एका घरात मुमताज इम्राहिम शेख (57) या राहतात. त्या दुपारी बारा वाजता घर बंद करून येरवडा येथे बाजारासाठी गेल्या होत्या. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून धूर येत असल्याचे काम चालू असलेल्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकानी पाहिले. त्यांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. त्याचवेळी आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाला. येरवडा अग्निशमनची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विजविण्यात आली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील सर्व सामान आगीत जळल्याने मोठे नुकसान झाले.