। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील खरबाचीवाडी आदिवासीवाडी येथील विवाहित महिला मंगळवारी (दि. 22) कोणालाही काही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. मात्र, अद्याप ती परत घरी न परतल्याने मंगल लहू जगताप यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी मंगल लहू जगताप यांची मुलगी रुचिता सुनील जाधव (22) हि मंगळवारी (दि. 22) 11 वाजण्याच्या सुमारास तिचा पती झोपलेला असताना घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली. मात्र, ती अद्याप घरी परत आलेली नाही. रुचिता सुनील जाधव (22), चेहरा उभट, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फूट, अंगाने सडपातळ, केस काळे व लांब, पायात पांढऱ्या रंगाची लेडीज बूट, गळ्यात दोन लहान मंगळसूत्र असून पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तरी सदरची महिला कोणाला आढळल्यास तपासिक अंमलदार सहाय्यक फौजदार निमकर मो.नं.- 9881020244 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन माणगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.