तळा शहरातून महिला बेपत्ता

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरातून 65 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा शहरातील मुंढ्याची वाडी येथील यमुना लक्ष्मण मोरे (65) या मुंढ्याची वाडी येथील घरातून दि.19 सप्टेंबर रोजी बाहेर पडल्या त्या अद्यापपर्यंत घरी परतल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्या हरविल्या असल्याची तक्रार तळा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. त्यांची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा गोल, शरीर बांधा सडपातळ, केस पांढरे-काळे कुरले बारीक अशा वर्णनाची महिला आढळल्यास तळा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन तळा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version