। पुणे । वृत्तसंस्था ।
भाड्याने घेतलेले दुकान उघडायचे नाही, या कराणावरुन दुकानाच्या जागा मालकाने एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर जागा मालकाने त्या महिलेला सिगारेटचे चटके दिले आहेत. हा प्रकार पुण्यातील खेड तालुक्यात घडला असून याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी जगदीश आरुडे आणि सुभाष आरुड या आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहेत.






