व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला लुटले

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघरमध्ये राहणाऱ्या महिलेला धमकावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच, आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली रमेश ढोपरे (36) याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ढोपरे हा वाशी एपीएमसी मार्केटमध्ये हमाली करतो. त्याचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील बनपुरी, ता. पाटण हे आहे. पीडित महिला खारघर परिसरात मुलांसह वास्तव्यास आहेत. 2013 ते 2022 या कालावधीत आरोपीने महिलेची ओळख वाढवत तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. आरोपीने महिलेच्या मुलाच्या गळ्याला कटर ब्लेड लावून धमकावत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच, तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी रोख, बैंक व्यवहार आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 20 लाख रुपये उकळले.

Exit mobile version