| पनवेल | वार्ताहर |
एका वृद्ध इसमाला सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना 2 लाख 15 हजारांनी लुबाडल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सदर वृद्ध इसम घरात असताना त्यांना निशा अग्रवाल या नावाने अज्ञाताने व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क साधून त्यांना व्हॉट्सअपवर अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांना व्हिडीओ कॉलवर त्यांच्यासारखे वर्तन करावयास लावून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच सदरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून विविध बँक खात्यांवर एकूण 2,15,997/- रू एवढी रक्कम पाठविण्यास भाग पाडली. मात्र, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.