| अलिबाग | प्रतिनिधी |
मैत्री करून प्रेमसंबंध असल्याचे भासवित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे. आरोपीने महिलेला तिच्या संमतीशिवाय बाहेर नेऊन बनावट पद्धतीने लग्न केल्याचे भासविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
बोडणवाडी, मेढेखार येथे दि. 22 मे 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून दि. 13 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी हा धोकवडे, ता. अलिबाग येथील रहिवासी असून, त्याने तक्रारदार महिलेशी मैत्री करून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे भासविले. त्यानंतर तिची कोणतीही कल्पना नसताना तिला सोबत घेऊन किहीम बीच येथे नेले. तेथे मंगळसूत्र घालून विवाह केल्याचा बनाव करून आरोपीने महिलेच्या राहत्या घरी तिच्यासोबत अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. यातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक सरके तपास करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
