| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वरसे येथील गणेश नगर प्रवेशद्वाराजवळ सरकार मिसळ परिसरातील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला होता. अनावधानाने या खड्ड्यात अनेक वाहने आदळत होती. तसेच, या रस्त्यावरून जाताना वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. याबाबत सततच्या तक्रारी होत असूनही संबंधित प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे येथील महिलांनी हा खड्डा भरण्याचा निर्णय घेतला. सरिता पालांडे आणि त्यांचा सहकारी महिलांनी पुढाकार घेत मुरूम व माती टाकून हा खड्डा बुजवला. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.