| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड संघर्ष संस्थेतील तरुणांनी रायगड प्रदक्षिणेप्रमाणे सरसगड प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. ही प्रदक्षिणा शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी (दि.19) सकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. त्यामुळे सरसगडाच्या भोवतालच्या ऐतिहासिक व नैसर्गिक परिसराची माहिती मिळणार आहे. तसेच, सरसगड प्रदक्षिणेची ही पहिली मोहीम असल्यामुळे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्साही आहेत. या प्रदक्षिणेचा मार्ग खडतर आहे. साहसी, जबाबदार ट्रेकिंगप्रेमींनी अवघड आणि जिद्दी अशा अविस्मरणीय प्रदक्षिणेचा अनुभव जरूर घ्यायला हवा. मात्र, अतिउत्साही व नियम न पाळणाऱ्या ट्रेकर्सने भाग घेऊ नये, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. तसेच, सरसगड प्रदक्षिणेसाठी 100 रु. नोंदणी फी आकारण्यात आली आहे.