। उरण । वार्ताहर ।
जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई बोके यांच्या आदेशानुसार व रायगड जिल्हा अध्यक्षा रेवती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अलिबाग महिलांच्या वतीने श्री समर्थ कृपा वृध्दधाम परहुरपाडा अलिबाग या आश्रमाला व तेथील वृद्धांना फ्रूट व वस्तू वाटप करण्याचा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्या प्राची भगत,कोमल नाईक, कल्पना चव्हाण, सायली राउळ, प्रतिमा सावंत, अंजली गुरव, सविता पाटील, प्रियंका सावंत, सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.







